Talegaon : घर घेण्यासाठी दिलेल्या साडेसहा लाखांचा अपहार

एमपीसी न्यूज – घर घेण्यासाठी विश्वासाने एका महिलेला साडेसहा लाख रुपये दिले. मात्र, महिलेने घर घेऊन न देता तसेच दिलेली रक्कम परत न करता फसवणूक केली. ही घटना शोभानगर, तळेगाव दाभाडे येथे घडली.

अनिता राजू माने (वय 40, रा. शोभानगर, तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सुशीला बालाजी भांबरे (रा. साई रेसिडेन्सी, तळेगाव दाभाडे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 जानेवारी ते 30 जानेवारी 2019 या कालावधीत ही घटना घडली. अनिता यांनी अविनाश ज्ञानेश्वर दळवी यांचे घर खरेदी करण्यासाठी सुशीला यांना वेळोवेळी एकूण साडेसहा लाख रुपये दिले. सुशीला यांनी अनिता यांना घर खरेदी करून दिले नाही.

तसेच अनिता यांनी दिलेले पैसे परत न देता त्यांना चेक दिले. सुशीला यांनी दिलेले चेकही बाउंस झाले. सुशीला यांनी फसवणूक केल्याचे अनिता यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.