Talegaon : घरगुती कारणांवरून पतीकडून पत्नीला मारहाण; पत्नीची पोलिसात धाव

एमपीसी न्यूज – घरगुती कारणावरून पतीने पत्नीला लाकडी बॅटने बेदम मारहाण केली. याबाबत पत्नीने पोलिसात धाव घेत पतीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 30) सकाळी सोमाटणे फाटा येथे घडली.

लक्ष्मी बच्चू सिंग (वय 40, रा. सोमाटणे फाटा पुनर्वसन, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बच्चू जोतपाल सिंग (वय 45) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे पती-पत्नी आहेत. गुरुवारी सकाळी पावणे दहा वाजता घरगुती वादातून त्यांचे भांडण झाले. भांडणात बच्चू याने लक्ष्मी यांना शिवीगाळ करत दमदाटी केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत लाकडी बॅटने बेदम मारहाण केली. यामध्ये लक्ष्मी यांच्या डोक्याला, हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.