Talegaon :कोरोना विरुद्धच्या लढ्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी सीमेवरील सैनिकांप्रमाणे लढावे : बाळा भेगडे

एमपीसी न्यूज : कोरोना विरुद्धच्या लढ्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी ‘कोरोना वारियर्स’ म्हणून काम करावे. सीमेवरील सैनिकाप्रमाणे या कोरोनायुद्धात सहभाग घ्यावा. मात्र, कोरोनाचा संसर्ग होणार नाही, याची पूर्णतः दक्षता घेऊन जनतेची, गोरगरिबांची सेवा आणि मदत करावी तसेच प्रशासन, पोलीस, डॉक्टर, स्वछता कर्मचारी, अत्यावश्यक सेवा देणारे सगळे कामगार या सर्व कोरोना योद्धयांनाही आवश्यक ती मदत करावी व त्यांचा सन्मान देखील करावा, असे आवाहन माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केले.

माजी राज्य मंत्री बाळा भेगडे, भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे आणि भाजपा तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी मावळ तालुक्यातील सर्व शहराध्यक्ष नगराध्यक्ष पंचायत समिती सभापती, सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे जवळपास तीन तास मीटिंग करून संपूर्ण तालुक्याचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

यामध्ये प्रामुख्याने कोरोना (कोविड 19) या रोगाचा व विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून कोणकोणत्या उपाययोजना केल्या आहेत तसेच यानंतर कोणत्या उपाय योजना करण्यात येणारआहोत याचा सविस्तर आढावा माजी राज्य मंत्री भेगडे यांनी घेतला. त्याचबरोबर उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या युद्धात स्वतःची काळजी घेऊन जनतेचे प्रश्न सोडवावेत. काम करताना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना काही अडचणी असल्यास त्या सोडवण्यासाठी मदत केली जाईल, असे आश्वासन माजीमंत्री भेगडे यांनी दिले. शेवटी आत्तापर्यंत केलेल्या कामाबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक करून त्यांना शाबासकी देण्यात आली.

देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार, माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर, माजी उपासभापती शांताराम कदम, प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस, जितेंत्र बोत्रे, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, तालुका महिला आघाडी अध्यक्ष सायली बोत्रे, देहूरोड शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार, तळेगांव शहराध्यक्ष  रवींद्र माने, लोणावळा शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, तळेगावच्या नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे, लोणावळा नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, नितीन घोटकुले,सागर शिंदे आदींनी आदींनी या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.