Talegaon : राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसीय निवासी शिबिराचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – अरिहंत कला-वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कॅम्प पुणे यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसीय निवासी शिबिराचे उद्घाटन शिबिराचे कान्हे येथे पार पडले.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य करण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने 75 विद्यार्थी कान्हे येथे शिबिरामध्ये सामील झाले आहेत. या शिबिराचे उद्घाटन गावचे सरपंच विजयजी सातकर यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी व्यासपीठावर कान्हे गावचे पोलीस पाटील शांतारामजी सातकर, ‘साई साईबाबा सेवा धाम’च्या संचालिका डॉ स्वाती वेदक, व्यवस्थापक दत्तात्रेय चांनगुडे, वडगाव येथील अध्यापक महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. संदीप गाडेकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यकारी अधिकारी रमजान वारुंकर, भूषण बिरादार, अरिहंत महाविद्यालयाच्या प्राध्यापिका मृदुला जाधव, मरियम फातिमा आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.