Talegaon : सुधारीत कर प्रणाली लागू करावी अन्यथा आंदोलन करण्याचा तळेगावकरांचा इशारा 

एमपीसी न्यूज  – वाढीव करआकारणी बाबतीत आज ज्येष्ठ नेते व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे व माजी नगराध्यक्ष सुरेशभाऊ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीच्या नगरसेवकांनी मुख्य अधिकारी वैभव आवारे यांची भेट घेतली.  तसेच ही झालेली कर वाढ अनेक चुकीच्या मुद्यांवर प्रकाश टाकत विशेष सभा बोलवून सुधारित कर प्रणाली लागू करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.
यावेळी नगरसेवक अरूण माने, वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, आनंद भेगडे व अशोक काकडे, दिलीप राजगुरव आदी  उपस्थित होते.
बापूसाहेब  पुढे म्हणाले, कर मुल्यांकन चुकीच्या पद्धतीने व नियमबाह्य पद्धतीने केलेले आहे. त्याचा फेर विचार व्हायला हवा. सर्व सामान्य लोकांना अडचणीत आणू नका. चुकीच्या बिलात दुरूस्ती करायला पाहिजे. घरगुती कर आकारणी आणि व्यावसायिक कर आकारणी ही काही ठिकाणी सरसकट केल्याने त्यावर बापूसाहेंबांनी नाराजी व्यक्त करून प्रशासनास धारेवर धरले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.