Talegaon News : ‘स्वा. सावरकर यांच्या विषयी अपमानास्पद वक्तव्याबद्दल राहुल गांधींवर गुन्हा दाखल करा’

तळेगाव शहर भाजपाची मागणी

एमपीसी न्यूज – देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आयुष्याची होळी करणारे महान क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी सातत्याने अपमानास्पद वक्तव्य (Talegaon News) करून करोडो देशभक्त नागरिकांच्या भावना दुखावणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली. तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे पक्षाच्या वतीने यासंदर्भात निवेदन देण्यात आले. 

PCMC: महापालिका वैद्यकीय अधिकारी यांना पदवी, पदव्युत्तर शिक्षणाची संधी

यावेळी शहराध्यक्ष रवींद्र माने,नगरसेविका शोभा भेगडे, सरचिटणीस शोभा परदेशी, उपाध्यक्ष सुधीर खांबेटे, सचिव गणेश देवरे, सोशल मीडिया अध्यक्ष उपेंद्र खोल्लम, ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी अध्यक्ष अनिल वेदपाठक, उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष अंशू पाठक, महिला उत्तर भारतीय आघाडी अध्यक्षा पौर्णिमा उपाध्याय,(Talegaon News) भाजयुमो माजी सरचिटणीस समीर भेगडे, ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी सचिव श्रीकांत वालावलकर, कामगार आघाडी सरचिटणीस आतिश रावळे, सोशल मीडिया सदस्य विक्रम खोल्लम, भाजयुमो माजी शहराध्यक्ष सूरज सातकर, विनोद उपाध्याय आदी उपस्थित होते.

नियोजन सोशल मिडिया अध्यक्ष उपेंद्र खोल्लम आणि कार्याध्यक्ष सचिन भिडे यांनी केले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.