Talegaon – नृत्य-संगीत-लोककलांच्या सादरीकरणाने रंगमंचावर रंगला वर्षान्त 2018

एमपीसी न्यूज – कला संस्कृतीचे रंगमंचावर मावळत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत ही संकल्पना गेली 16 वर्षे राबवत असलेल्या कलापिनी आणि कृष्णराव भेगडे प्रतिष्ठान आयोजित वर्षांत 2018 -19 व्या वर्षीही आबालवृद्धांच्या उत्साही प्रतिसादाने साजरा झाला.
कलापिनी सांस्कृतिक केंद्रात सायं 6:30 ते रात्री 12:30 असा 6 तास चाललेल्या या कार्यक्रमात तळेगाव, पिंपरी-चिंचवड, पुणे येथील 25 संस्थांनी 350 चे वर कलाकारांनी सहभाग घेतला.

जोशीली नृत्ये, बालभवन चे विलोभनीय बालनृत्य, हास्ययोग नाना नाणी पार्कचे नृत्य व गावातर्फे पहाट, जे डी फिटनेस चे शरीर सौष्ठव कार्यक्रम, दीपक माने चे गीत गायन, पूर्वेश जोशीचा खणखणीत पोवाडा, विनायक लिमये, विराज सवाई व प्रतीक यांचे विनोदी भारूड, ऑर्केस्ट्रा असे विविधरंगी कार्यक्रमांचा प्रेक्षकांनी मनमुराद आनंद घेतला.

निगडीच्या राजश्री धोंगडे व सहकलाकारांनी कथक आविष्काराने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. दुबई येथे नृत्य ऑलिंपियाड मध्ये पारितोषिक मिळविल्याबद्दल मंगेश शिंदे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अविनाश शिंदे याने केले.

तळेगावात शतकमहोत्सव करणारे गणेश मोफत वाचनालय, लेखक प्रभाकर ओव्हाळ व गायक संगीतकार विनायक लिमये यांनी वर्षांत २०१८ पुरस्कार महोत्सवाचे अध्यक्ष श्री कृष्णरावजी भेगडे यांच्या हस्ते देण्यात आले. या प्रसंगी ‘सन 1981’ या चित्रपटाचे प्रमुख कलाकार सुनील गोडबोले व दिग्दर्शक शिव बागुल यांचाही सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर यांनी प्रास्ताविक केले. हेमंत झेंडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अनंत परांजपे व मानपत्राचे वाचन डॉ विनया केसकर यांनी केले. सुनील गोडबोले यांनी तळेगावकर रसिक व कलापिनीचे कौतुक केले. पुरस्कार विजेत्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

ध्वनी संयोजन सुमेर नंदेश्वर यांनी केले, तंत्र आणि प्रकाश योजना विनायक काळे आणि चेतन पंडित, आदित्य धामणकर, अशोक बकरे, सायली रौंधल यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.