_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Talegaon Dabhade : खांडगे स्कूलचा ‘डिजिटल योगा’; विद्यार्थ्यांना शिकवली ऑनलाइन योगासने

Khandge School's 'Digital Yoga'; Taught students online yoga

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूलने डिजिटल माध्यमाच्या मदतीने ‘जागतिक योग दिवस’ साजरा केला. दरवर्षी शाळेमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा योग दिवस’ यावर्षी कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे हा दिवस ऑनलाईन साजरा करण्यात आला.

यंदाच्या योग दिनाचे ‘घरच्या घरी योग, परिवारासोबत योग’ असे घोषवाक्य देण्यात आले होते. शाळा प्रशासनाकडून सर्व शिक्षक, विदयार्थी व पालक या सर्वांना योग दिवसात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते.

_MPC_DIR_MPU_II

त्यानुसार, सर्व इयत्तेचे विद्यार्थी आणि शिक्षकांनी या ऑनलाईन योगा कार्यक्रमास हजेरी लावली.

शाळेचे योगा शिक्षक युनूस पटेल यांनी विद्यार्थ्यांना प्राणायम, ताडासन अशी विविध प्रात्यक्षिके करून दाखवली. सर्वांनी त्याचे अनुकरण केले.

शाळेतील सर्व शिक्षक ,विदयार्थी व पालक वर्गाने या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका , शाळाप्रशासन व शिक्षकवर्ग यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.