Talegaon : ‘मायमर’मध्ये सोमवारपासून कोविड केंद्र सुरु होणार

Kovid center will start from Monday in 'Mymar'

एमपीसीन्यूज  : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या संकटाचा सामना करण्यासाठी मावळ तालुक्यातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने मायमर हॉस्पिटल तळेगाव दाभाडे येथे कोविड-19 केअर सेंटर उभारुन उपाययोजना करण्यासंदर्भातील बैठक आमदार सुनिल शेळके यांच्या अध्यक्षतेखाली  पार पडली.  या रुग्णालयात सोमवारपासून ( दि. 8 ) कोविड केंद्र सुरु करण्याचा निर्णय यावेळी  घेण्यात आला. 

यावेळी  मायमर हाॅस्पिटलमधील सद्य परिस्थिती, आरोग्य सुविधा, उपाययोजना याची यावेळी आमदार सुनिल शेळके यांनी पाहणी करुन माहिती घेतली. ‘मावळ तालुक्याच्या जनतेच्या आरोग्यासाठी भाऊसाहेब सरदेसाई रुग्णालय यांनी पुढाकार घेत कोविड19 केअर सेंटर हाॅस्पिटल उभारणीसाठी सकारात्मकता दर्शविली. त्याबद्दल डॉ. दिलीप भोगे,  डाॅ. सुचित्रा नागरे यांचे आमदार शेळके यांनी आभार मानले.

यावेळी माजी राज्यमंत्री भेगडे यांनी हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉक्टर, नर्स, स्टाफ यांना विमा कवच देण्याची मागणी केली. येथील रुग्णांना २ वेळचे जेवण मिळावे आणि कोणताही रुग्ण रुग्णवाहिकेशिवाय वंचित राहू नये, अश्या सूचना केल्या.

त्यावर प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी सर्व स्टाफला 50  लाखाचे विमा कवच देण्यात येईल   सांगितले.  तसेच रुग्णवाहिका आणि जेवणाचे व्यवस्थित नियोजन करण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, कोविड केंद्र सुरु झाल्यानंतर येथील डाॅक्टर व हेल्थ केअर कामगारांना संरक्षण कवच व वेतन, हाॅस्पिटलमध्ये दोन पोलीस 24 तास तैनात करणे, तीन रूग्ण वाहिका, सहा व्हेंटिलेटर, रूग्णांची जेवणाची चांगली सोय आणि नाॅन- कोविड रूग्णांची सोय वेगळ्या इमारतीत व्यवस्था कारण्याबाबत या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मायमर मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक व मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. डाॅ. दिलीप भोगे यांनी दिली.

यावेळी  मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, डॉ. सुचित्रा नागरे, डॉ. दिलीप भोगे, पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, तालुका आरोग्याधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे,तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड, लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन पवार, वडगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुवर्णा ओगले आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.