Talegaon : ‘जगण्यासाठी हसा आणि हसण्यासाठी जगा’… विनोद सांगा स्पर्धेतील सूर

जागतिक हास्य दिनानिमित्त आयोजन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील कलापिनी हास्ययोगाच्या १५ वा वर्धापन दिन, जागतिक हास्य दिन आणि कलापिनीचे हास्ययोग प्रमुख अशोक बकरे यांचा वाढदिवस अशा तिहेरी योगाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमाला नवचैतन्य हास्ययोग परिवार पुणेचे संस्थापक विठ्ठल काटे, लाफ्टर योग इंटरनॅशनलचे महाराष्ट्र शाखाध्यक्ष मकरंद टिल्लू यांची हास्यप्रेरक उपस्थिती लाभली होती.

या निमित्ताने ५० वर्षावरील जेष्ठांसाठी विनोद सांगा स्पर्धा आयोजित केली होती. प्राथमिक फेरीतील ३५ स्पर्धाकांमधून १० जणांची निवड अंतिम फेरीसाठी झाली होती. या अंतिम फेरीतील स्पर्धकांसाठी डॉ.अनंत परांजपे यांनी कार्यशाळा घेतली. प्राथमिक फेरीचे परिक्षण संजय मालकर आणि श्रीधर कुलकर्णी यांनी केले तर अंतिम फेरीचे परीक्षण मकरंद टिल्लू आणि डॉ.शाळीग्राम भंडारी यांनी केले.

  • या स्पर्धेत प्रथम क्रमांक अनघा बुरसे, द्वितीय क्रमांक प्राची साठे तर, तृतीय क्रमांक सुनिता बकरे, नागेश धोपावकर आणि मधुकर पानट यांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली. सर्व स्पर्धकांना पुस्तके देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

विठ्ठल काटे, मकरंद टिल्लू व सुमन काटे यांनी हास्य योगाचे विविध प्रकार घेऊन ताणताणावातून मुक्ती देणारे हे हास्य किती फलदायी आहे याची महती पटवून दिली व ‘जगण्यासाठी हसा आणि हसण्यासाठी जगा’ हा मोलाचा संदेश दिला.

  • मकरंद टिल्लू हे स्वतः जलमित्र असून त्यांनी गळके,फुटके नळ शोधून तिथे चांगले नळ बसवा व पाणी वाचवा असे सांगितले. या समारंभात गेली १५ वर्षे कलापिनी हास्ययोगाची धुरा सांभाळणारे हास्ययोग प्रमुख अशोक बकरे यांचा वाढदिवस साजरा झाला तसेच संस्थेचे विश्वस्त श्री प्रभाकर तुंगार व आजीव सदस्य सुजाता जोशी यांना त्यांच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमास पुण्याच्या नवचैतन्य हास्यपरिवाराचे उपाध्यक्ष विजय भोसले, खजिनदार मणियार, छायाचित्रकर गदो आणि देसाई यांची उपस्थिती लाभली होती. डॉ.अनंत परांजपे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. भरतकुमार शुक्ल यांनी सूत्रसंचालन केले तर, डॉ.भंडारी यांनी आभार मानले.

  • कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दीपक जयवंत, श्री.व.सौ.पांढरे, श्रीपाद बुरसे, प्रतिक मेहता (ध्वनी संयोजन) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.