Talegaon : ‘लॉकडाऊन’मध्ये मावळात गरजूंसाठी झटताहेत राजकीय पदाधिकारी, बांधकाम व्यावसायिक, लोकप्रतिनिधी

एमपीसी न्यूज -कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. अशा परिस्थितीत कुणीही उपाशी राहू नये म्हणून विविध सेवाभावी कार्यकर्ते आणि संस्था गरजू नागरिकांपर्यंत अन्नधान्य व अन्नदानाची मदत   करीत आहेत. या मध्ये भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रामनाथ वारींगे यांनी 55 हजार 200 रूपयांचा निधी भाजप सहाय्यता निधीसाठी दिला आहे, तर तळेगाव तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक अरुण माने यांनी संचारबंदीच्या काळात कुटुंबीयांची मदत घेत सुमारे शंभर गरजूंना जेवणाचे डबे पोहोच केले. शिवाय सामाजिक बांधिलकी जपत बांधकाम व्यवसायिकांनीही ५१ हजारांची मदत केली आहे. 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी मावळ तालुका भाजपाला सहाय्यता निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन तालुका भाजपा अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष रामनाथ वारींगे यांनी 55 हजार 200 रूपयांचा निधी धनादेशाद्वारे मावळ तालुका भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर व सरचिटणीस सुनील चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

या प्रसंगी मावळ तालुका संघटन मंत्री किरण राक्षे, प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे, माजी उपसरपंच प्रदिप हुलावळे, दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंभोरे, क्रीडा आघाडी अध्यक्ष नामदेव वारींगे, सुतार परिषद अध्यक्ष दिनकर यादव, पंढरीनाथ भिलारे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासन कोरोनाच्या संकटाचा धैर्याने आणि कौशल्याने सामना करीत आहे. मावळ तालुका भाजपाकडून एक हात मदतीचा अंतर्गत अन्नधान्य वाटप उपक्रम मावळ तालुक्यात राबविण्यात येत आहे. या कठीण काळात अन्नधान्य खरेदी करीता ज्येष्ठ नेते रामनाथ वारींगे यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

दरम्यान, मावळ तालुक्यातील जनतेला मदत देत असताना वारंगवाडी गावात सुध्दा अन्न धान्याचे कीट वाटप करण्यात आले. लाॅकडाऊन उठेपर्यंत गावातील एकही कुटुंब उपाशी राहू देणार नाही, असे वारींगे यांनी यावेळी सांगीतले.

 

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक अरुण माने संचारबंदीच्या काळात सुरूवातीपासून घरातील कुटुंबीयांची मदत घेत स्वतः पदार्थ बनवून सुमारे शंभर गरजूंना जेवणाचे डबे पोहोच करत आहेत.

देशात लॉकडाऊन असल्याने हातावर पोट असणाऱ्या लोकांना व अत्यंत गरिब लोकांना जेवण देण्यासाठी, स्वतः पदरमोड करून ते ही मदत करीत आहेत. आहेत. ही मदतनसून ते कर्तव्यच आहे, असे मानून नगरसेवक माने व त्यांचे संपूर्ण कुटूंब एकही दिवस खाडा न करता गरजूंना जेवणाचे डबे देण्याचे कर्तव्य पार पाडत आहेत.

वडगाव नगरपंचायतीला ५१ हजारांची मदत

श्री स्वामी समर्थ डेव्हलपर्स व समर्थ कंन्स्ट्रक्शनचे गणेश भेगडे, अविनाश दौंडकर, रोहित गिरमे तसेच माय फर्स्ट स्टेप प्रायमरी स्कूलच्या संस्थापिका, विद्यमान उपनगराध्यक्षा मायाताई अमर चव्हाण व सुजाता गणेश भेगडे यांच्यावतीने वडगाव नगरपंचायतीस ५१ हजारांचा धनादेश देण्यात आला.

यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे, मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, नगरसेवक राजेंद्र कुडे, किरण म्हाळसकर, गणेश भेगडे, अविनाश दौंडकर, रोहित गिरमे,  मायाताई  चव्हाण, सुजाता भेगडे,  राहुल ढोरे, चंद्रजित वाघमारे, निखील भेगडे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.