BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon : मंगरूळ येथे डंपरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; एकजण गंभीर

एमपीसी न्यूज – ओव्हरटेक करून जात असणा-या डंपरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला तर, एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. 11) मावळ तालुक्यातील मंगरूळ येथे घडली.

करण ठाकर (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रवींद्र आत्माराम घोलप (वय 19, रा. घोलपवाडी, ता. मावळ) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, राम धोंडिबा कांबळे (वय 38, रा. मुळशी, ता. हवेली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राम डंपरचालक आहे. सोमवारी मावळ तालुक्यातील मंगरूळ येथे डंपर घेऊन जात असताना समोरच्या डंपरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी समोरच्या दुचाकीला राम याच्या डंपरची धडक बसली. यामध्ये दुचाकीवरून जाणा-या करण आणि रवींद्र यांना गंभीर दुखापत झाली. यामध्ये करण याचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.