Talegaon MIDC Crime News : एकच जमीन दोघांना विकून फसवणूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – एकच जमीन दोघांना विकून फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्ती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 29 डिसेंबर 2017 रोजी मावळ तालुक्यातील आंबळे येथे घडला आहे.

बबु कुटी कुरयिन (वय 67, रा. स्पायसर कॉलेज रोड, औंध, पुणे) यांनी याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजय किसन गायकवाड (रा. वानवाडी, पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील आंबळे येथे आरोपी विजय गायकवाड याची 152 आर जमीन आहे. त्यातील दहा आर क्षेत्र आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी यांना विकले. त्याबाबत दुय्यम निबंधक कार्यालय वडगाव मावळ येथे दस्त केला. तसेच त्या जमिनीची सातबारा रजिस्टरला नोंद करण्यासाठी आणखी तीन हजार रुपये घेतले. मात्र सातबारा रजिस्टरला संबंधित जमिनीची नोंद केली नाही.

त्यानंतर फिर्यादी यांना विकलेली 10 आर आणि उर्वरित 142 आर अशी एकूण 152 आर जमीन आरोपीने शांताबाई मोहनराव काकडे यांना विकली. याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.