Talegaon Crime News : मारहाणप्रकरणी मावळच्या माजी उपसभापतींविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – मंदिरात झालेल्या भांडणाच्या रागातून घरात घुसून एकाला मारहाण केल्याप्रकरणी मावळ पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि विद्यमान सदस्य शांताराम कदम यांच्यासह सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीचा प्रकार सोमवारी (दि. 1) सकाळी मावळ तालुक्यातील कदमवाडी -आंबळे येथे घडला.

शांताराम बापू कदम, आत्माराम सीताराम कदम, अजिंक्य शांताराम कदम, सचिन शंकर कदम, विष्णू बाप्पुसाहेब कदम, विशाल शांताराम कदम (सर्व रा. कदमवाडी आंबळे, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत सुनील शिवाजी कदम (वय 38, रा. कदमवाडी आंबळे, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताराम कदम आणि फिर्यादी सुनील कदम यांचे वैयक्तिक कारणांवरून कदमवाडी आंबळे येथील मंदिरात भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून सोमवारी सकाळी साडेसात वाजता शांताराम कदम आणि त्यांचे अन्य साथीदार यांनी फिर्यादी कदम यांच्या घरात घुसून त्यांना लाकडी काठी आणि कु-हाडीच्या दांड्याने मारहाण केली.

त्यात सुनील कदम जखमी झाले आहेत. याबाबत भारतीय दंड विधान कलम 323, 324, 504, 506, 143, 147, 148, 149, 452 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.