Talegaon MIDC News : गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांकडून सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अवैधरित्या प्रतिबंधित गुटखा वाहतूक करत असलेल्या दोघांकडून पाच लाख 90 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 29) रात्री पावणे अकरा वाजता एमआयडीसी रोडवर करण्यात आली.

हनुमान रुपाराम चौधरी (वय 25), धर्मराज मयाराम चौधरी (वय 38) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई गणपत शांताराम शेकरे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका स्कॉर्पिओ कार (एम एच 12 / एच एल 7305) मधून बेकायदेशीररित्या शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा वाहून नेला जाणार असल्याची माहिती तळेगाव एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नवलाख उंब्रे कडून वडगावकडे जाणा-या रोडवर सापळा लावून कारवाई केली. त्यात पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा आणि कार असा एकूण पाच लाख 90 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.