BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon : तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने यांची बदली

पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने यांची बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कल्पेश मराठे मारहाण प्रकरणानंतर तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी राजमाने यांच्या बदलीची मागणी केली होती.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात अंतर्गत बदल्या आणि बाहेरून आलेल्या पोलीस अधिका-यांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये रावेत पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांची तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. तर राजेंद्रकुमार राजमाने यांची वाकड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक (गुन्हे) बदली करण्यात आली आहे.

कल्पेश मराठे मारहाण प्रकरणात तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी कल्पेश मराठे याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. त्यामुळे त्यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी सुनील शेळके आणि कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली. याप्रकरणानंतर राजेंद्रकुमार राजमाने यांची बदली करण्यात आली आहे.

HB_POST_END_FTR-A2

.