Talegaon : राज्यमंत्री संजय भेगडे यांचा आज पश्चिम महाराष्ट्रात महाजनादेश यात्रेचा दौरा

एमपीसी न्यूज – गेल्या पाच वर्षात केंद्र आणि राज्य शासनाने अनेक लोकोपयोगी योजना राबविल्या. त्या योजनाची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी व राज्यात पुन्हा सत्तेत येण्यासाठी जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा 1 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान होणार आहे.

पश्चिम महाराष्ट्राच्या महाजनादेश यात्रेच्या कार्यक्रमाबाबत कोल्हापूर येथे महाजनादेश यात्रा पश्चिम महाराष्ट्र प्रमुख राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांनी बैठक घेऊन आढावा घेतला. या यात्रेच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.