Talegaon : कुस्ती आखाड्यास खासदार बारणे यांची भेट; आमदारांनी बांधला खासदारांना फेटा

एमपीसी न्यूज – श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीच्या वतीने रविवारी (दि. 7) भव्य कुस्ती आखाडा आयोजित करण्यात आला. या आखाड्याला खासदार श्रीरंग बारणे यांनी भेट दिली. निवडणुकांच्या कार्यव्यस्ततेतून त्यांनी आपली कुस्तीची आवड जोपासत खास कुस्त्या पाहण्यासाठी हजेरी लावली. उपस्थितांना श्री डोळसनाथ उत्सव आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आमदार बाळा भेगडे यांनी स्वतः खासदार बारणे यांना फेटा बांधला.

यावेळी आमदार बाळा भेगडे, जिल्हा परिषद सदस्य सागर भोसले, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, सुनील शेळके, सुरेश धोत्रे, केदार भेगडे, सचिन भेगडे, शाम भेगडे, बबन भेगडे, संतोष भेगडे, संदीप काकडे, चेतन भेगडे, सुनील भोंगाडे आदी उपस्थित होते. खासदार बारणे यांचा उत्सव समितीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

  • बारणे यांच्या हस्ते तळेगावचे सुपुत्र पुणे विद्यापीठाचे चॅम्पियन पैलवान अॅड. रवींद्र दाभाडे आणि किशोर दाभाडे या पैलवनांचा सन्मान करण्यात आला. पैलवान वैभव तांगडे विरुद्ध पैलवान किरण जाधव आणि पैलवान पार्थ कंदारे विरुद्ध पैलवान संजय नलावडे या दोन कुस्त्या बारणे यांच्या हस्ते लावण्यात आल्या. ‘लाल मातीतील कुस्तीची परंपरा जोपासण्यासाठी उत्सव समिती पुढाकार घेत आहे. त्यामुळे कुस्तीचा विकास होत आहे. ही आनंदाची बाब आहे’, असे म्हणत बारणे यांनी उपस्थित कुस्तीप्रेमींना शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like