Talegaon Dabhade: कोरोनाविषयक दैनंदिन माहितीसाठी तळेगाव नगरपालिकेचा डॅशबोर्ड

Talegaon Municipal Dashboard for Corona Updates from Kedar Bhegade-Grandure Infotech services कोरोनाच्या प्रभावी तपासणीसाठी फिंगरटीप पल्स ऑक्सिमीटर यंत्राचे 5 सेट तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडे सुपूर्द करण्यात आले.

एमपीसी न्यूज- कोरोना रुग्णांची शहरातील सद्यस्थिती व बाधितांची संख्या याची दररोजची अचूक माहिती तळेगावमधील नागरिकांना उपलब्ध व्हावी याकरिता ऑनलाइन लिंकचे उद्घाटन तळेगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड आणि नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या हस्ते करण्यात आले. केदार भेगडे युवा मंच व ग्रँडयुअर इन्फोटेक सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जात आहे.

यावेळी कोरोनाच्या प्रभावी तपासणीसाठी फिंगरटीप पल्स ऑक्सिमीटर यंत्राचे 5 सेट तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडे सुपूर्द करण्यात आले.

तळेगाव दाभाडे कोरोना अपडेट्स पाहण्यासाठीचे संकेतस्थळ- http://covid.granduerservices.com/User/Dashboard

यावेळी अरुण भेगडे, चेतन जाधव, अमित सरोदे, जमीर नालबंद, लक्ष्मण भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.