Talegaon : एमआयडीसी परिसरात काम करणा-या महिलांना स्वयंसुरक्षा प्रशिक्षण देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाकडून पोलिसांना निवेदन

एमपीसी न्यूज – तळेगाव एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमध्ये काम करणा-या महिलांना स्वयंसुरक्षा प्रशिक्षण देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाकडून करण्यात आली. याबाबतचे निवेदन तळेगाव एमआयडीसी पोलिसांना देण्यात आले.

तळेगाव एमआयडीसी परिसरातील प्रत्येक कंपनीमधील महिलांसाठी सुरक्षा प्रशिक्षण घेण्यात यावे. त्याबाबतच्या सूचना पोलिसांनी कंपन्यांना द्याव्यात. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग व कामगार नेते विशाल लोखंडे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसांना दिले आहे. यावेळी अक्षय धामणकर, निलेश नाचण, चेतन दहिभाते उपस्थित होते.

हैदराबाद येथे दुचाकी पंक्चर झाल्यावर मदतीच्या नावाखाली काही नराधमांनी २६ वर्षीय डॉक्टर महिलेवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर पीडित महिलेला अमानुषपणे जिवंत जाळले. या प्रकरणात हैदराबाद पोलीस कारवाई करतील. पण त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महिलांना स्वयंसुरक्षेचे धडे देणे आवश्यक आहे. तळेगाव एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमध्ये दिवस आणि रात्रपाळीमध्ये अनेक महिला काम करतात. त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस गस्त आणि स्वयंसुरक्षेचे धडे देणे आवश्यक आहे.

महिला पोलीस अधिकारी आगाऊ यांनी निवेदन स्वीकारले. तसेच प्रत्येक कंपनीशी संपर्क करून महिला सुरक्षेबाबत योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सांगण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक कंपनीमध्ये महिला पोलीस मित्राची नेमणूक केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like