Talegaon News : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रस्त्यात दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या वृद्ध महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हा अपघात तळेगाव चाकण रस्त्यावरील माऊंटसेंटएन शाळेसमोर सोमवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास झाला.

जखमी महिलेला उपचारासाठी सुरुवातीला तळेगाव त्यानंतर पिंपरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. ४) घडली.

_MPC_DIR_MPU_II

मंजुळा चंद्रकांत शेलार (वय 60, रा. संभाजीनगर, वडगाव मावळ) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत उमेश चंद्रकांत शेलार (वय 32, रा. अंबरनाथ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गजानन अजित ढवळे (वय 38, रा. वडगाव मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन अजित ढवळे हे वडगाव मावळ येथून मंजुळा शेलार यांना दुचाकी वरून तळेगावच्या दिशेने घेऊन जात असता त्यांची दुचाकी माऊंटसेंटएन शाळेसमोर घसरली. त्यात मंजुळा शेलार या रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. सुरुवातीला त्यांना तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पुढील उपचारासाठी त्यांना वायसीएम रुग्णालयात हलविले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.