Talegaon News : पुणे पिपल्स बँकेच्या तळेगाव शाखेचा 22 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
एमपीसी न्यूज – तळेगाव स्टेशन परिसरातील शुभम कॉम्प्लेक्स येथे नुकताच पुणे पिपल्स बँकेच्या तळेगाव शाखेचा 22 वा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. पुणे पिपल्स बँकेची हि शाखा 6 मे 2000 रोजी सुरु करण्यात आली होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्यात आला असून यावेळी बँकेचे अध्यक्ष सि. ए. जनार्दन रणदिवे, ज्येष्ठ संचालक बबनराव भेगडे, सरव्यवस्थापक सदानंद दिक्षित तसेच नामवंत कंपन्याच्या कामगार संघटनांचे पदाधिकारी व खातेदार उपस्थित होते. यावेळी बँकेकडून मास्क, सॅनिटायझर आणि बँकेचे नाव असलेल्या बॅगचे वाटप करण्यात आले.
बँकेच्या विविध ठेव योजना चालू असून ज्येष्ठ नागरिकांसाठी वाढीव व्याजदराची ठेव योजना, लहान मुलांसाठी बचत खाते योजना तसेच आधुनिक पद्धतींचा वापर करत आरटीजीएस, एनीएफटी, एटीएम, टॅक्स पेमेंट, पॉस मशिन यासारख्या सुविधाही सुरु आहेत.
तळेगाव शाखेत 40.00 कोटी एतक्या एकूण ठेवी, 135.00 कोटी इतके एकूण कर्ज, 5.46 कोटी रुपये निव्वळ नफा झाला.
पुणे पिपल्स बँकेची स्थापना 1952 मध्ये झाली. या बँकेच्या एकूण 25 शाखा असून या बँकेला मल्टीस्टेट बँकेचा दर्जा आणि ISO नामांकनही प्राप्त झालेले आहे. या सर्व शाखांचा मिळून 265 कर्मचारी वर्ग आहे. सर्व शाखांची एकूण 1221 कोटी ठेवी, 16.5 कोटी निव्वळ नफा, 785 कोटी कर्जवाटप झाले असून 2020-21 या आर्थिक वर्षात 21 कोटींचा व्यवसाय झाला आहे.
बँकेचे अनुउत्पादित कर्ज 1% आहे. त्यामुळे बँकेची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या ऑडिट अहवालात नमूद केले आहे. पगारदार नोकरदारांसाठी बँकेने वैयक्तिक 15 लाखांपर्यंत कर्जपुरवठा केलेला आहे. त्यामुळे 2000 कामगारांना स्वतःच्या मालकीची घरे घेता आली.