Talegaon News : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या माध्यमातून वडगाव नगरपंचायतीस 50 पीपीई किट

0

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने वडगाव नगरपंचायतीला 50 पीपीई किट देण्यात आली. ग्रामीण भागातही कोरोना मृत्यूचे प्रमाण वाढल्याने सध्याच्या परिस्थितीची गरज ओळखून ही मदत करण्यात आली.

या प्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. राहुल दांडेकर, रो. श्रीशैल मेंथे, रो. निलेश कुमार, रो. डॉ. सुर्यकांत, नगराध्यक्ष मयूर ढोरे, मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, सुभाष जाधव, तुकाराम ढोरे, उपनगराध्यक्ष प्रमिला बाफना, नगरसेवक राजेंद्र कुडे उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

वडगाव शहरातील कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार वडगाव स्मशानभूमीतच करावे अशा सूचना आरोग्य खात्याने वडगाव नगरपंचायतीला केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पीपीई किट देण्यात आले. यापूर्वी कोरोना मृतांचे अंत्यसंस्कार हे तळेगाव येथील गॅस शवदाहिनीमध्येच होत होते.

रो. श्रीशैल मेंथे व रो. निलेश वाघचौरे यांनी या प्रकल्पासाठी आर्थिक हातभार लावला. वडगाव नगरपंचायतीच्या वतीने नगराध्यक्ष मयूर ढोरे, मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment