Talegaon News : मुलीला जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार, आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – मुलीला जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 2018 ते 11 जानेवारी 2022 या कालावधीत तळेगाव दाभाडे परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी संबंधित आरोपीला तळेगाव दाभाडे येथून अटक करण्यात आली आहे.

 

याबाबत 36 वर्षीय पिडीत विवाहित महिलेने शुक्रवारी (दि.14) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपीने फिर्यादी महिला व तिच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली व फिर्यादी महिलेवर बलात्कार केला. असे फिर्यादीत नमूद केले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.