Talegaon News : आदर्श ग्राम कान्हेवाडीने वृक्षारोपणाची परंपरा कायम राखली

एमपीसी न्यूज – आदर्श ग्राम कान्हेवाडी तर्फे चाकण (ता.खेड) ग्राम पंचायतीने वृक्ष लागवड व संवर्धनाची गेल्या 20 वर्षांपासूनची परंपरा कायम राखली.

जागतिक पर्यावरण दिनी सरपंच भाऊसाहेब पवार यांचे हस्ते वृक्षारोपण सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. 200 रोपांची लागवड करण्यात आली व या सप्ताहात एकूण 1000 रोपांची लागवड करण्यात येणार आहे.

ग्राम पंचायत व सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ग्रामस्थ, युवक, महिला बचत गट व शिक्षकवर्ग यांच्या सहकार्याने गेल्या 20 वर्षात 10 हजार देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे व सर्व वृक्षांचे संगोपन – संवर्धन करण्यात आले आहे. त्यामुळे निसर्ग सौंदर्य, शुद्ध – स्वच्छ हवा व आल्हाददायक वातावरण कायम असते.

यावर्षी कडुलिंब, वड, पिंपळ, चिंच, बांबू, जांभूळ, आवळा, बेहडा, बहावा, बकूळ, अर्जून, शिसम, करंज या देशी वृक्षांची लागवड इंद्रायणी काठ परिसर, शाळा परिसर तसेच घरांभोवती व शेतांच्या बांधांवर यावर्षी वृक्षरोपांची लागवड होत आहे. असे उपसरपंच राहुल येवले यांनी सांगितले.

भविष्यात नाना नानी पार्क, अत्याधुनिक क्रीडांगण व सुसज्ज मंगल कार्यालय उभारण्याचा निर्धार ग्राम पंचायत व ग्रामस्थांनी केला असल्याची माहिती ग्रामसेवक अरुण हुलगे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.