Talegaon News : ग्राहक प्रबोधन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी अनिल भांगरे

एमपीसी न्यूज – ग्राहक प्रबोधन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी तळेगाव येथील साप्ताहिक ‘मावळ दर्शन ‘ चे मुख्य संपादक अनिल भागाजी भांगरे यांची निवड करण्यात आली आहे.

ग्राहक प्रबोधन समिती, महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सुहास जिद यांच्याकडून तसे भांगरे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे.

नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, ग्राहक प्रबोधन समिती (रजि.) ही समिती संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कार्यरत असून ग्राहकांचे संरक्षण करण्याकरिता आपल्या सारख्या अभ्यासू कार्यकर्त्यांची समितीस खूप गरज आहे. त्याचबरोबर आपली ग्राहक चळवळी विषयी आवड, सामाजिक संघटन व काम करण्याची इच्छा पाहून आपली पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

भांगरे हे अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष असून मानवाधिकार संरक्षण संघटनेचे आजीव सदस्य आहेत. तसेच महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव व मावळ तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समिती शासन नियुक्त सदस्य आहेत.

पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष व तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळाच्या उपसभापती पदाची धुरा याआधी भांगरे यांनी यशस्वीपणे सांभाळलेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.