Talegaon News : बंजारा क्रांती दलाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी अर्जुन आढे

एमपीसीन्यूज : बंजारा क्रांती दलाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी अर्जुन प्रभाकर आढे ( राठोड) यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जयकुमार राठोड यांनी आढे यांची नियुक्ती केली. तसेच त्यांना नियुक्ती पत्र दिले. यावेळी  सामाजिक कार्यकर्ते अशोक कुलकर्णी  उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

पदाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात वास्तव्यास आलेल्या बंजारा समाजाचे संघटन केले जाईल. त्यांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यास प्राध्यान्य राहील, अशी ग्वाही अर्जुन आढे यांनी नियुक्तीनंतर दिली.

दरम्यान, आढे यांच्या नियक्तीबद्दल पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ कॅडबरी युनिटच्या सदस्यांनी यांचे अभिनंदन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.