Talegaon News : श्रीराम जन्मभूमीवरील भव्य दिव्य मंदिरासाठी स्वतः अयोध्याच सरसावली

एमपीसी न्यूज – कुंडमळा (इंदोरी) येथे राहणारी अयोध्या किशोर भेगडे वय वर्षे ०6, हीने आपल्या खाऊसाठी साठविलेल्या सुट्ट्या पैशांची पूर्ण बेरीज करून एकूण 3453 रुपये अयोध्येतील राम जन्मभूमी वरील साकारणाऱ्या भव्य दिव्य अशा श्री राम मंदिरासाठी स्वेच्छेने देऊ केले. या तिच्या साठविलेल्या पैशांमध्ये अधिक रक्कम जोडून तिच्या कुटुंबाने एकूण रक्कम रुपये 10 हजार या अभियानांतर्गत समर्पित केले आहे

“माझे नाव अयोध्या असल्याचा मला फार अभिमान वाटतो आणि अयोध्या ही प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी असून तेथे त्यांच्या जन्मभूमी वरील मंदिर पुन्हा उभारले जात आहे आणि त्या मंदिरासाठी मदत करणे मला फार आवडेल म्हणून मी हे खाऊचे पैसे त्याकरीता देत आहे ” अशी भावना तिने तिच्या बोबड्या शब्दातून व्यक्त केली.

_MPC_DIR_MPU_II

श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या, यासाठी राबत असलेल्या निधी संकलन अभियानाच्या तळेगाव दाभाडे येथील जिल्हा कार्यालयात राष्ट्रसेविका समिती, पश्चिम क्षेत्राच्या कार्यवाहीका सुनंदा प्रकाशराव जोशी व प्रतिक्षा प्रदीप देसाई यांच्या हस्ते हा निधी सोपवण्यात आला.

याप्रसंगी निधी समर्पण अभियान सहप्रमुख संतोष वसंतराव भेगडे(पाटील) व स्वामी विवेक स्वामी विवेकानंद शाखा मुख्य शिक्षक व अभियान निधी प्रमुख विवेकानंद वस्ती तळेगाव दाभाडे संतोष सुभाष अध्यापक व युवा उद्योजक बजरंग दलाचे अयोध्याचे वडील श्री किशोर विठ्ठलराव भेगडे हे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.