Talegaon News : बबनराव भेगडे यांचा वाढदिवस साधेपणाने; आंदर मावळात फळ वाटप

एमपीसीन्यूज – कोरोनाच्या जागतिक महामारीच्या संकटामुळे मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचे जाहीर केले आहे. याबाबत त्यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट टाकली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आंदर मावळात फळ वाटप केले. तसेच आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत साधेपणाने भेगडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

बबनराव भेगडे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, माझे कार्यकर्ते, सहकारी, सर्व परिचित सालाबाद प्रमाणे 20 मार्च रोजी माझा वाढदिवस साजरा करण्यास उत्सुक असतात. मात्र, गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या महामारीमुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत वाढदिवस साजरा करणे उचित होणार नाही. प्रत्येकाने शुभेच्छा देण्यासाठी प्रत्यक्ष न भेटता दूरध्वनीवरून द्याव्यात.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार आपल्या सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. आजवरच्या माझ्या सामाजिक, सहकार आणि राजकीय वाटचालीत आपल्या शुभेच्छा, आशीर्वाद सदैव माझ्यासोबत राहीले आहेत व पुढेही राहील, असा विश्वास भेगडे यांनी व्यक्त केला आहे. आपण आपली व आपल्या कुटुंबातील सर्वांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान , भेगडे यांच्या घरी एका छोटेखानी कार्यक्रमात मावळचे आमदार सुनील शेळके, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाबुराव वायकर, खादी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष अंकुश आंबेकर यांच्यासह तालुक्यातील लोणावळा, देहूरोड, तळेगाव,वडगाव, कामशेत आदी ठिकाणच्या पक्षाच्या मोजक्याच पदाधिका-यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार, युवा नेते पार्थ पवार, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विदुरा तथा नाना नवले, माजी आमदार कृष्णराव भेगडे, दिगंबर भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश अप्पा थोरात, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक व ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे आदींनी दूरध्वनीवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

आंदर मावळात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून फळ वाटप

राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे व माजी मंत्री मदन बाफना यांच्या वाढदिवसानिमित्त आंदरमावळ भागात (सावळा ते इंगळुनपर्यंत) राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष शिवाजी असवले, संघटनमंत्री नारायण ठाकर, सरपंच मोहन घोलप, चेअरमन अनिल जाधव, युवा उद्योजक नवनाथ तानाजी पडवळ, माजी सरपंच भिकाजी भागवत, आंदर मावळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिगंबर आगिवले, माजी सरपंच बाळासाहेब खंडागळे आदींकडून फळ वाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.