Talegaon News : नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी बाळा भेगडे

सचिवपदी संतोष खांडगे यांची नियुक्ती

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेच्या अध्यक्षपदी संजय तथा बाळा भेगडे, तर सचिवपदी संतोष दत्तात्रय खांडगे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज, गुरुवारी (दि 29) महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली. त्यामध्ये नियामक मंडळ पदाधिकारी व सदस्य यांची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कृष्णराव भेगडे होते.

नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे

संजय तथा बाळा भेगडे (अध्यक्ष), गणेश खांडगे (उपाध्यक्ष), संतोष खांडगे ( सचिव), नंदकुमार शेलार (सहसचिव), राजेश राजाराम म्हस्के (खजिनदार), रामदास काकडे, चंद्रकांत शेटे, महेशभाई शहा, यादवेंद्र खळदे, दामोदर शिंदे, वसंतराव भेगडे, सोनबा गोपाळे, शंकर नारखेडे, विनायक अभ्यंकर ( सर्व सदस्य )

सभेचे व निवडीचे कामकाज अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाले. यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिका-यांचा व सदस्यांचा सत्कार माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या हस्ते करण्यात आला. यापुढे सर्वश्री कृष्णराव भेगडे, सुरेशभाई शहा, गणपतराव काळोखे, माजी आमदार रूपलेखा ढोरे, वसंतराव खांडगे हे सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत.

नवनिर्वाचित अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले की, नूमविप्र मंडळ संस्थेला 115 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असून संस्थेचे माजी अध्यक्ष कृष्णराव भेगडे यांनी सर्व जातीधर्मातील व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना एकत्रित करून संस्थेचा चोखपणे कारभार केला आहे. त्याचपद्धतीने आम्ही नवीन कार्यकारिणी पुढेही असाच कारभार करू, तसेच अधिकाधिक शाखांचा विस्तार करू.

सूत्रसंचालन संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी केले. तर आभार संस्थेचे सहसचिव नंदकुमार शेलार यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III