Talegaon News : निवृत्तीनंतर नवीन आयुष्याची सुरुवात – संतोष खांडगे 

एमपीसी न्यूज – सेवानिवृत्ती ही फक्त नोकरीतून निवृत्ती असते तर, निवृत्तीनंतर नवीन आयुष्याची सुरुवात असते असे मत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी व्यक्त केले.

इंदुरी येथील प्रगती विद्या मंदिर व आनंदराव नामदेव काशीद पा. कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रीती जंगले या 33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाल्या विद्यालयाने आयोजित केलेल्या त्यांच्या सेवापूर्ती समारंभात संतोष खांडगे बोलत होते.

यावेळी प्राचार्या प्रिती जंगले व रामकृष्ण जंगले या दांपत्याचा सत्कार माजी आमदार दिगंबर भेगडे व संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांच्या हस्ते करण्यात आला.

पुढे बोलताना संतोष खांडगे म्हणाले की, सेवानिवृत्तीनंतर नवीन आयुष्य सूरू होते ते आयुष्य आनंदाने व्यतीत करावे तसेच जंगले मॅडम यांनी आपल्या मुख्याध्यापक काळात उत्तम प्रशासन संभाळले पवना शिक्षण संकुल व प्रगती विद्या मंदिर येथे त्यांनी आपल्या कामासा ठसा उमटविला.

यावेळी आमदार दिगंबर भेगडे, रामकृष्ण जंगले, रागिणी भोसले, वैजयंती कुल, भारत काळे यांनी मनोगत व्यक्त केले.

सत्काराला उत्तर देताना प्रीती जंगले म्हणाल्या, “संस्था, सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ यांनी दिलेल्या सहकार्यामुळेच समाधानी सेवा करणे शक्य झाले. त्याबद्दल मी कायम त्यांची ऋणी राहील. ”

या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे, जेष्ठ नेते बबनराव ढोरे, उद्योजक प्रशांत भागवत, संस्थेचे सल्लागार सुरेश शहा, शालेय समितीचे अध्यक्ष दामोदर शिंदे, संस्थेचे संचालक महेश शहा, सोनबा गोपाळे, माजी मुख्याध्यापक दशरथ ढमढेरे, बलभीम भालेराव, मुख्याध्यापक कैलास पारधी, संजय वंजारे, पर्यवेक्षिका निला केसकर, प्रवीण भोसले आदी उपस्थित होते.

मच्छिंद्र बारवकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. लक्ष्मण मखर व वैजयंती कुल यांनी सूत्रसंचालन केले तर चंद्रकांत धनवे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.