Talegaon News : भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश किसनराव भेगडे यांचा वाढदिवस साजरा

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्ष तळेगाव दाभाडे शहर व पै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्था मर्या. यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय जनता पक्ष पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश किसनराव भेगडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश किसनराव भेगडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दिनांक ०1.०2.2021 सोमवार रोजी पै. विश्वनाथराव भेगडे नागरी पतसंस्था तसेच तळेगांव दाभाडे शहर भाजपच्या वतीने शहरातील डॉ. सुदाम खेडकर व डॉ. अनिल उनकुले यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

तळेगावातील प्लाझ्मा डोनर व कोरोनाच्या खडतर काळामध्ये गोरगरिबांना घरोघरी जाऊन अन्न तसेच शिदा वाटप केलेल्या विविध संस्था, मंडळे यांच्या कार्यकर्त्यांना कोरोना योद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला या वेळेस माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक बाळासाहेब नेवाळे, जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, मावळ तालुका भाजपा अध्यक्ष रवींद्र आप्पा भेगडे, तळेगाव शहराध्यक्ष रवींद्र माने,संस्थेचे चेअरमन दत्तात्रय नाटक, पुणे जिल्हा उपाध्यक्ष अशोक काळोखे, मावळ युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, नगराध्यक्ष चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष सुशिल सैंदाणे,गटनेते अमोल शेटे, माजी शहराध्यक्ष संतोष दाभाडे, प्रभारी वैभव कोतुळकर तसेच सर्व आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, संस्थेचे संचालक सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस रविंद्र साबळे, विनायक भेगडे, प्रदीप गटे, प्रमोद देशक,सुनील भेगडे,शोभा परदेशी, रजनी ठाकुर, अक्षय भेगडे, शिवांकुर खेर यांनी केले तर आभार अशितोष हेंन्द्रे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.