Talegaon News : ‘तळेगाव दाभाडे’च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी भास्कर जाधव

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी भास्कर मधुकर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकताच या पदाचा पदभार स्वीकारला.

_MPC_DIR_MPU_II

तळेगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांची गुन्हे शाखा युनिट 1 मध्ये बदली झाली आहे. त्यामुळे यांच्या रिक्त जागी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाकडून जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.

भास्कर जाधव यांनी या अगोदर चतुरशृंगी पोलीस ठाणे, डेक्कन पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखा व पोलीस कल्याण विभाग येथे कार्यभार सांभाळला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.