Talegaon News: पुनर्मूल्यांकनानंतर सरस्वती विद्यामंदिरची भूमी शिंदे दहावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम

एमपीसी न्यूज – मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत म्हणजेच दहावीच्या परीक्षेत तळेगाव दाभाडे येथील सरस्वती विद्या मंदिरची भूमी कृष्णा शिंदे हिला 98.40 %गुण मिळाले होते, परंतु तिने पुनर्मूल्यांकन साठी टाकलेल्या उत्तरपत्रिकेत तिचे 7 गुण शालांत परीक्षा बोर्डाकडून वाढविण्यात आले त्यामुळे आता तिची गुणांची टक्केवारी 99.40 इतकी झाली असून ती शाळेत व मावळ तालुक्यात शालांत परीक्षेत प्रथम आली आहे.

तिच्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष सुरेश झेंड, उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी,  शिक्षण समिती सदस्य विश्वास देशपांडे,  डॉ. ज्योती चोळकर, मुख्याध्यापिका रेखा परदेशी, पर्यवेक्षक सुरेखा रासकर व माध्यमिक विभागाच्या शिक्षकांनी घरी जाऊन तिचे अभिनंदन केले.

एमपीसी न्यूज – अंतरंग दसरा विशेषांक वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संस्था सदस्य व इतर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी फोन वरून भूमीचे कौतुक केले व तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.