Talegaon News : अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त रोटरी क्लब आणि ‘स्माईल’ तर्फे सायकल रॅली

एमपीसी न्यूज – 26 जून अंमली पदार्थ विरोधी दिन व अवैध वाहतूक दिनानिमित्त, सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी आणि स्माईल व्यसनमुक्ती केंद्र, उर्से यांच्यावतीने व्यसनमुक्त समाज निर्माण व्हावा, या उद्देशाने ही सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे.

स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष हर्षल पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय ते तळेगाव सिटी येथपर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडेसहा वाजता पोलीस कृष्णप्रकाश यांच्या हस्ते स्माईल सायकल रॅलीचा प्रारंभ होईल तसेच, आमदार सुनिल शेळके यांच्याकडून प्रत्येक सायकल स्वारांना गुलाबपुष्प देऊन नाना नानी पार्क (तळेगाव सिटी) येथे रॅलीचा समारोप होईल.

26 जून अमली पदार्थ विरोधी दिन व अवैध वाहतूक प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो. व्यसनमुक्त समाज निर्माण व्हावा, या उद्देशाने या रॅलीचे आयोजन केल्याचे हर्षल पंडित यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.