Talegaon News : स्वीकृत सदस्यपदासाठी भाजपाकडे इच्छुकांची झुंबड

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्य पदाकरिता भारतीय जनता पक्षाकडे 12 जणांनी मागणी केली आहे. पक्षश्रेष्ठी यातून कोणाची वर्णी लावते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

नगरपरिषदेतील भारतीय जनता पक्षाचे स्वीकृत सदस्य सुरेश दाभाडे यांचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर करताच स्वीकृत सदस्यांच्या एका जागेकरिता पक्षाकडे इच्छुकांची झुंबड उडाली आहे.

भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष रवींद्र माने यांच्याकडे पक्षाचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी स्वीकृत सदस्यपद देण्याची मागणी केली आहे. यामध्ये भाजपाचे शहर सरचिटणीस प्रमोद देशक, सह्याद्री इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष सुनिल भेगडे, शहर ओबीसी मोर्चा अध्यक्ष नितीन पोटे, युवा उद्योजक चिराग खांडगे, भाजयुमो मावळ तालुकाध्यक्ष संदिप काकडे, माजी चिटणीस राहुल पारगे, शहर कोषाध्यक्ष सतिष राऊत, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा ज्योती जाधव, दिलीप सुतार,अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्ष सुनिल कांबळे, भाजयुमोचे माजी अध्यक्ष सूरज सातकर, ज्येष्ठ कार्यकर्ते संजय वाडेकर यांचा समावेश आहे

भारतीय जनता पक्षाची कार्ड कमिटी याबाबत निर्णय घेणार असल्याचे शहराध्यक्ष माने यांनी सांगितले.

नगरपरिषदेतील जनसेवा विकास आघाडीने स्वीकृत सदस्य रवींद्र आवारे यांचाही राजीनामा मंजूर केला आहे. त्यांच्या जागेवर जनसेवा विकास समिती कोणाला संधी देते याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिलेले आहे. याबाबत जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे व प्रमुख हे निर्णय करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.