Talegaon News: गणेशोत्सवानिमित्त आयोजित शिबिरात 42 जणांचे रक्तदान

तळेगाव दाभाडे –  रोट्रॅक्ट क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी स्पॉन्सर बाय रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी, श्री गणेश तरुण मंडळ, बालाजी मंदिर ट्रस्ट ( वैष्णव समाज) आणि श्री विठ्ठल मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आज (रविवारी) रक्तदान शिबिराचे आयोजन विठ्ठल मंदिर देवस्थानाच्या कै. कासाबाई उमाजी भेगडे सभागृहामध्ये करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 42 जणांनी रक्तदान केले.

कोरोनाचा वाढता प्रभाव बघता सामाजिक बांधिलकी जपत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमासाठी गरवारे ब्लड बँकेचे विशेष सहकार्य लाभले. हया कार्यक्रमाचे नियोजन रोट्रॅक्टचे अध्यक्ष प्रतीक माने, सचिव वैभव तनपुरे तसेच विठ्ठल मंदिर देवस्थानचे यतिन शहा श्री गणेश तरुण मंडळाचे विश्वस्त केदार मेढी, रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे अध्यक्ष  रो. संतोष ए. शेळके, सचिव रो. दीपक फल्ले व रोटरी सदस्य डॉ. मिलिंद निकम, महेश सोनपावले, हेमंत वाणी आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे अध्यक्ष रो. संतोष शेळके यांनी कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता गरवारे ब्लड बँक बरोबर जास्तीत जास्त रक्तदान शिबिरे घेण्याचे ठरवले आहे. लवकरच पुन्हा एकदा असेच रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. कार्यक्रमाचे

सूत्रसंचालन रो. प्रणव लऊळकर यांनी केले तर प्रकल्प प्रमुख म्हणून रो. अवधूत साळुंखे आणि रो. अथर्व कदम यांनी काम पहिले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.