Talegaon News : ‘कलापिनी’च्या वतीने ऑनलाईनद्वारे योगदिन साजरा

एमपीसीन्यूज : कलापिनी हास्ययोगाच्यावतीने यंदा फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी हास्ययोग प्रमुख अशोक बकरे यांनी विविध आसनांची माहिती सांगितली.

चैतन्य जोशी यांनी योग्य प्रात्याक्षिके सादर केली. बकरे यांनी योग्याभ्यासाचे महत्त्व सांगितले. तसेच आधासन, सेतुबंधासन, वज्रासन आदी आसने आणि प्राणायाम या प्रात्यक्षिकांचे दैनंदिन जीवनात असलेले उपयोग या विषयी माहिती दिली.

जागितक योग दिन साजरा करण्याचे संस्थेचे हे सातवे वर्ष आहे. कोरोना प्रतिबंध असल्याने एकत्र येऊन योगाभ्यास करता येत नसला तरी ऑनलाईन स्वरुपात सदस्यांनी आपापल्या घरी आसने केली. योग दिनाचे औचित्य साधून बकरे यांचा रोटरी सिटी आणि रोटरी मावळ यांच्या वतीने योग प्रशिक्षक म्हणून सत्कार करण्यात आला.

ऑनलाईन पद्धतीने योग दिन साजरा करण्यासाठी चेतन पंडित आणि शार्दुल गद्रे यांनी तांत्रिक सहाय्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.