Talegaon News : कलापिनीच्या ऑनलाईन बालभवनमध्ये दिव्यांची अमावस्या उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – आषाढ अमावस्या म्हणजे दिव्यांची अमावस्या. कलापिनीच्या ऑनलाईन बालभवन मधे दिव्याची अमावस्या उत्साहात साजरी झाली.

मुलांना ही अमावस्या साजरी का करायची, दिव्यांची पुजा, नैवेद्य, दिव्यांची माहिती या विषयी ज्योती ढमाले यांनी छान मार्गदर्शन केले. विनया परांजपे यांनी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे स्क्रीन वर दाखवले व सुमधूर आवाजात “शुभंकरोती म्हणा मुलांनो ” हे गीत सादर केले.

केतकी लिमये यांनी मुलांन कडून सुंदर अशा कागदाच्या पणत्या तयार करुन घेतल्या. रानडे बाईंनी मुलांना पणतीची गोष्ट सांगितली. कार्यक्रमाचे नियोजन अनघा बुरसे व मधुवंती रानडे यांनी केले. शेवटी सर्वांनी मिळून शुभंकरोती म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.