_MPC_DIR_MPU_III

Talegaon News : छत्रपतींच्या गादीचा अवमान सहन करणार नाही – गणेश भेगडे

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात छत्रपतींच्या घराण्याला आणि गादीला मानणारे लोक आहेत. त्यांचा अवमान आणि टीका केल्यास सहन करणार नाही, असे मत भाजप पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी व्यक्त केले.

_MPC_DIR_MPU_IV

प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपतींच्या घराण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर भेगडे यांनी आंबेडकर यांना ठणकावले आहे.

छत्रपतींची गादी व छत्रपती शिवरायांचे वंशज यांना संपूर्ण महाराष्ट्रात व देशात मान आहे. प्रकाश आंबेडकर यांनी खासदार उदयनराजे भोसले व छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्यावर जी आक्षेपार्ह शब्दात टीका केली ती निंदनीय आहे. छत्रपतींच्या वंशजावरील टीका आम्ही खपवून घेणार नाही अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना ठणकावले.

_MPC_DIR_MPU_II

प्रकाश आंबेडकर यांनी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजी राजे भोसले यांच्यावर टीका केली. उदयनराजे आणि संभाजी राजे यांचा नामोल्लेख टाळत “एक राजा तर बिनडोक तर दुसऱ्यांचा आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर”, असं आंबेडकर म्हणाले आहेत.

त्या घटनेस गणेश भेगडे यांनी मावळ मध्ये उत्तर देताना सडेतोड प्रतिक्रिया दिली. प्रकाश आंबेडकर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यभर याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. प्रकाश आंबडेकर यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवत भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी त्यांच्या वक्तव्याचा परखड समाचार घेतला .

ते पुढे म्हणाले “छत्रपती घराण्याचे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दल प्रकाश आंबेडकर यांनी केलेले वक्तव्य निंदनीय आहे. संपूर्ण राज्यात छत्रपतींच्या गादीला मानणारे लोक आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील जनता छत्रपतींच्या घराण्याला त्यांच्या गादीला वंदन करत आली आहे. त्यामुळे सातारच्या गादीचा अवमान खपवला जाणार नाही. त्यांच्यावरील टीका कदापि सहन केली जाणार नाही”, असे गणेश भेगडे यांनी सांगितले.

“दोन्हीही छत्रपतींनी, सातारा आणि कोल्हापूरच्या गादीच्या प्रतिनिधींनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. असे असताना प्रकाश आंबेडकरांसारख्या मोठ्या माणसाने छत्रपतींच्या वंशजांवर टीका करणे गैर आहे, चुकीचं आहे. आम्ही पुणेकर म्हणून आणि छत्रपतींना मानणारे मावळे म्हणून छत्रपतींच्या वंशजांवर केलेली टीका कदापि सहन करणार नसल्याचे” भेगडे यांनी ठणकावून सांगितले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.