Talegaon News : लसीकरणाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा : गटविकास अधिकारी भागवत यांचे आवाहन

तळेगाव येथील मायमर मेडिकल कॉलेजमध्ये लसीकरण सुविधा केंद्राचे उद्घाटन, ज्येष्ठ नागरिकांना 200 रुपयांमध्ये लस

एमपीसी न्यूज – “कोविडच्या काळात डॉ. भाऊसाहेब सरदेसाई रुग्णालयाने केलेले कार्य हे खरच कौतुकास्पद आहे. त्यातच आता येथे सुरू करण्यात आलेल्या लसीकरणचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा.” असे आवाहन मावळचे गटविकास अधिकारी भागवत यांनी केले.

एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रूग्णालय येथे नागरिकांसाठी कोविड लसीकरण सुरु करण्यात आले आहे. या लसीकरण सुविधा केंद्राचे उद्घाटन मावळचे गटविकास अधिकारी भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी मायमर वैद्यकीय महाविद्यायाच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे, प्राचार्य डॉ. राजेंद्र गुप्ता, रूग्णालय अधिक्षक डॉ. प्रशांत कामत, उपप्राचार्य डॉ. धनाजी जाधव व कोविड नोडल अधिकारी डॉ. सुदीप कुमार उपस्थित होते. या सुविधा केंद्रात जेष्ठ नागरिकांना केवळ 200 रुपयांत लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी प्रथम लस येथील नागरिक जगन्नाथ चव्हाण यांना देण्यात आली.

भागवत म्हणाले,“ या आधी रुग्णालयाने 27 जानेवारी पासून मावळातील एकूण 2900 आरोग्य सेवा कर्मचारी, पोलीस, एनडीआरएफ, पालिका कर्मचारी आणि इतर फ्रंट लाईन वर्कर्ससाठी मोफत कोविड लसीकरण सेवा राबविली होती. यांचे हे कार्य ही कौतुकास्पद आहे.”

डॉ. सुचित्रा नागरे म्हणाल्या,“ कोविड पासून बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिक आणि सहरुग्णता असणारांनी या लसीकरण सुविधेचा लाभ घ्यावा. सदर सुविधा ही शासनाने निर्धारित केलेल्या प्रति डोस केवळ अडीचशे रुपयांत व ज्येष्ठ नागरिकांना विशेष बाब म्हणून केवळ दोनशे रुपयांत उपलब्ध करण्यात आली आहे.”

लसीकरण समन्वयक म्हणून पीएसएम विभागाचे काम डॉ.एस.जे. कुलकर्णी हे पाहत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.