Talegaon News : नगरसेवक संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने 1100 गणेश मूर्तींचे संकलन

स्वयंसेवकांच्या हस्ते विधिवत पूजा करीत सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तसेच सर्व निर्माल्य एकत्र करून ते नैसर्गिक खत (कंपोस्ट खत) निर्मितीसाठी देण्यात आले.

तळेगाव दाभाडे – नगरसेवक संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने तळेगाव दाभाडे येथिल गाव भागातून 1100 गणेश मूर्तींचे संकलन  करण्यात आले. यावेळी  स्वयंसेवकांच्या हस्ते विधिवत पूजा करीत सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तसेच सर्व निर्माल्य एकत्र करून ते नैसर्गिक खत (कंपोस्ट खत) निर्मितीसाठी देण्यात आले.

या वर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तळ्यावर किंवा नदी पात्रात विसर्जन करण्यास शासनाच्या वतीने बंदी घालण्यात आली होती. नागरिकांनी आपल्या घरच्या गणेश मूर्तींचे घरीच विसर्जन करावे, असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले होते.

तळेगाव मधील गणेश विसर्जन हे सातव्या दिवशी करण्यात आले. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून नगरसेवक संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने गाव भागात फिरत्या विसर्जन हौदांची व्यवस्था करण्यात आली होती.

शासनाने दिलेल्या नियमांचे पालन व्हावे यासाठी हा उपक्रम घेण्यात आला होता. यावेळी नागरिकांनी आपल्या घराच्या गणेश मूर्तीना स्वयंसेवकांच्या हातात सुपूर्द कराव्यात व निर्माल्य वेगळ्या पिशवीत द्यावे, असे आवाहन नगरसेवक संतोष भेगडे यांनी केले होते.

या उपक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गाव भागातील सर्व विभागामध्ये गणेश मूर्ती संकलन करण्यात आले. नागरिकांच्या घराजवळ जाऊन स्वयंसेवक मूर्ती घेऊन ती वाहनात ठेवत होते. गणेश मूर्ती संकलनासाठी सुमारे 20 वाहने होती. यासाठी ट्रॅकटर, टेम्पो व रिक्षा या वाहनाचा उपयोग करण्यात आला.

यावेळी 1100 श्रीगणेश मूर्तींचे संकलन केले व त्यांचे सर्व कार्यकर्त्यांच्या व स्वयंसेवकांच्या हस्ते विधिवत पूजा करून सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तसेच सर्व निर्माल्य एकत्र करून ते नैसर्गिक खत (कंपोस्ट खत) निर्मितीसाठी देण्यात आले.

यावेळी नगरसेवक संतोष भेगडे, दिनकर भेगडे, सचिन भेगडे, सोमनाथ भेगडे, शंकर भेगडे, शंकर वाजे, संजय एकनाथ भेगडे, बबन दगडू भेगडे, संतोष शेलार, पिराजी भेगडे, रुपेश गरुड, धनराज माने, निलेश निंबळे, आशुतोष भेगडे, अनिकेत वाघोले, सिद्देश भेगडे, जीवन भेगडे, ऋषिकेश माने, ऋषिकेश भेगडे, शुभम भेगडे, अक्षय मुरकुटे, गणेश माळी, शुभम सातकर, कार्तिक गवारे, किरण सोनवणे, ऋतिक टकले व तरुण ऐक्य मित्र मंडळाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मूर्ती संकलनासाठी व विसर्जन करण्यासाठी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.