Talegaon News : सुप्रीम कंपनी उर्से युनिट मधील कामगारांना कंपनीच्या वतीने मोफत लस देण्याची मागणी 

एमपीसी न्यूज – सुप्रीम कंपनी उर्से युनिट मधील सर्व कामगारांना कंपनीच्या वतीने covid-19 लस मोफत देण्यात यावी, अशी मागणी सुप्रीम कंपनी उर्से युनिटचे युनियन अध्यक्ष अशोक दादाभाऊ दाभाडे यांनी कंपनीचे एचआर मॅनेजर नंदकिशोर शिंपी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी सुप्रीम कंपनी व सेनेचे युनियन अध्यक्ष अशोक दाभाडे, युनियन लीडर प्रदीप धामणकर, योगेश घारे, अविनाश गराडे आदी उपस्थित होते.

दाभाडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहता तिचा प्रसार झपाटयाने होत आहे, आपल्या कंपनीत कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून त्याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी.

कोविड 19 लस कंपनीमध्ये मोफत देण्यात यावी, यासाठी पैलवान विश्वनाथराव भेगडे माथाडी आणि जनरल कामगार युनियन, सुप्रीम उर्से युनियनच्या वतीने निवेदनात विनंतीही करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.