Talegaon News : परिसरात कोरोना रुग्णांकरिता विशेष ज्यादा बेड वाढविण्याबाबतची मागणी

0

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील परिसरात कोरोना रुग्णांकरिता विशेष ज्यादा बेड वाढविण्याबाबतची मागणी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका वैशाली दाभाडे यांनी तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी त्यांच्या समवेत नगरसेविका संगीता शेळके, मावळ तालुका संघटक ज्योती शिंदे व मावळ तालुका युवती अध्यक्षा निशा पवार उपस्थित होत्या.

दाभाडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, तळेगाव दाभाडे परिसरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संसर्गामुळे रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी बेड कमी पडत असून, रुग्णालयांमध्ये प्रचंड गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे.

_MPC_DIR_MPU_II

तळेगाव दाभाडे शहर, तळेगाव स्टेशन, सोमाटणे फाटा आधी ठिकाणची रुग्णालये संपूर्ण भरलेली असून,शहर परिसरातील नव्याने भरती होण्यासाठी लागणारे बेड उपलब्ध नसल्याने काही रुग्णांना नाईलाजाने गृहविलगिकरणामध्ये राहावे लागत आहे. दररोज अशा रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असून, आरोग्य सेवेवर ताण येत आहे असेही स्पष्ट केले आहे.

तळेगाव परिसरात सध्या उपलब्ध असलेल्या रुग्णालयांमध्ये ज्यादा बेड टाकण्याचे आदेश आपण द्यावेत. त्यामुळे रुग्णांची आरोग्य सेवा व्यवस्थित होईल. तसेच दररोज जे लसीकरण होत आहे,त्या लसीकरण केंद्रांची देखील संख्या वाढवावी, लसीकरण करून घेण्यासाठी नागरिक लसीकरण केंद्रांवर गर्दी करत असल्याने,खूप वेळ जात आहे.

तहसीलदार साहेबांनी कोरोना रुग्णांसाठी ज्यादा बेड वाढविण्याचा आदेश द्यावा, तसेच तळेगाव शहरातील लसीकरण केंद्राची संख्या वाढवावी अशी विनंती ही केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment