Talegaon News : शहरात वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शहरामध्ये वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा सुरळीत होण्याबाबतची मागणी तळेगाव शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने यांनी महावितरण कार्यकारी उपअभियंता राजेंद्र गोरे व वितरण अधिकारी गजानन झोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी नगरसेवक संतोष शिंदे,भाजयुमो तळेगाव अध्यक्ष अक्षय भेगडे, स्टेशन भाजयुमो अध्यक्ष शिवांकुर खेर, तळेगाव शहर उपाध्यक्ष संजय जाधव, हिम्मत पुरोहित, आशुतोष हेंद्रे, ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप सुतार, ओबीसी मोर्चा कार्याध्यक्ष सचिन जाधव, भाजयुमो सरचिटणीस निखिल म्हाळसकर, उपाध्यक्ष सागर भेगडे उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वीजपुरवठ्यामुळे ऑनलाईन शाळा, कॉलेज लेक्चर,वर्क फ्राॅम होम आणि व्यापारी आदींची मोठी गैरसोय होत आहे. होणारी गैरसोय टाळण्यासाठी वीजपुरवठा सुरळीत करावा आणि वेळ निश्चित करुन दुरुस्तीची कामे करावीत असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

वीजपुरवठा वारंवार खंडीत होणार नाही याबाबत खबरदारी घेऊन दुरूस्तीच्या कामकाजाबाबत लवकर वेळ निश्चित करुन याबाबतची समस्या सोडविली जाईल असे महावितरण उपअभियंता राजेंद्र गोरे व गजानन झोपे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.