Talegaon News : शहरातील आठवडे बाजार संभाजीनगर येथे हलविण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शहरातील आठवडे बाजार संभाजीनगर येथे हलविण्याचा नगरपरिषदेचा निर्णय रद्द करावा यासाठी तळेगाव शहर भारतीय जनता पक्ष व व्यापारी संघटनेच्यावतीने नगराध्यक्षा चित्रा जगनाडे व उपमुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, बाजारपेठ, तेली आळी, सुभाष चौक परिसर येथे परंपरागत बाजार भरत असून या बाजारावर गाव भागातील व्यापारी-छोटे मोठे दुकानदार व्यावसायिक यांचा व्यवसाय अवलंबून आहे.अनेकांचे आठवड्याचे आर्थिक गणित या बाजारावर विसंबून असल्यामुळे या बाजाराची जागा बदलल्यास बाजारासाठी पंचक्रोशीतील येणारे ग्राहक बाजारपेठेकडे पाठ फिरवतील व या सर्व व्यापारी बांधवांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल त्यामुळे ही जागा बदलण्यास भारतीय जनता पक्ष तळेगाव दाभाडे व व्यापारी बांधवांच्या वतीने विरोध दर्शविला आहे.

यावेळी शहराध्यक्ष रविंद्र माने, सरचिटणीस प्रदिप गटे, विनायक भेगडे, कोषाध्यक्ष सतिष राऊत, उपाध्यक्ष हिम्मतभाई पुरोहित, ओबीसी मोर्चा कार्याध्यक्ष सचिन जाधव, व्यापारी आघाडी अध्यक्ष निर्मल ओसवाल, पुणे जिल्हा भाजप व्यापारी आघाडीचे राकेश ओसवाल, भवरमल ओसवाल, संदिप जगनाडे, ज्ञानेश्वर गुंड, पद्मभूषण डंबे, ललीत घोलप, सोमनाथ शेलार हे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.