Talegaon News : ‘माळवाडीच्या कचर्‍याची तळेगाव कचरा डेपोवर विल्हेवाट लावा’

एमपीसीन्यूज : माळवाडीत गावातील कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची सुविधा नसल्याने माळवाडी येथील कचर्‍याची समस्या गंभीर बनत चालली आहे. मालवाडीच्या कचऱ्याची तळेगावच्या कचरा डेपोवर विल्हेवाट लावण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी माळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत आज माळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्यांनी तळेगाव नगरपरिषदेचे आरोग्य समिती सभापती व ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे यांची भेट घेत निवेदन दिले.

यावेळी सरपंच चंद्रकांत दाभाडे, ग्रामपंचायत सदस्य सुनिल भोंगाडे,अर्जुन आल्हाट, संभाजी दाभाडे, शहाजीराजे दाभाडे, सुनिल जाधव, राहुल जाधव, संपत दाभाडे, रोहिदास मराठे, दिलीप दाभाडे, आणि ग्रामसेवक खेसे आदी उपस्थित होते.

कचरा डेपोअभावी माळवाडीतील कचऱ्याची समस्या गंभीर होत असल्याची बाब सरपंच आणि सदस्यांनी श्री भेगडे यांच्या निदर्शनास आणून दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.