Talegaon News : वसंतराव भसे पाटील युवा मंचच्या वतीने म्हाळूंगे कोविड सेंटरमध्ये साहित्य वाटप

एमपीसीन्यूज : सांगुर्डी (ता. खेड) येथील वसंतराव भसे पाटील युवा मंचच्या वतीने खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त म्हाळूंगे कोविड सेंटर येथील १०० रुग्णांना व ५० आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी खेड पंचायत समितीचे माजी सभापती बाळशेठ ठाकूर व रा.यु.काॅं.चे अध्यक्ष कैलास लिंभोरे यांच्या हस्ते रुग्णांना बकेट, साबण, टूथपेस्ट, टूथब्रश, वाफ घेण्याचे उपकरण तर आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई कीटचे वाटप करण्यात आले.

सरपंच रविंद्र गाढवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास गणेश बोत्रे, देवीदास जाधव, संतोष बोत्रे, सुधीर गाडे, नितीन गाडे, गणेश भसे, शुभम भसे, राकेश भसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रास्ताविक व स्वागत वसंत भसे यांनी केले. आभार रोहिदास भसे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.