Talegaon News : रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीमार्फत महादेवी माध्यमिक शाळेत शालेय उपयोगी वस्तूचे वाटप

एमपीसी न्यूज – मावळ मधील इंगळून येथील महादेवी माध्यमिक शाळेमध्ये रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी मार्फत हॅप्पी स्कुल या प्रकल्प अंतर्गत नुकतेच विद्यार्थ्यांसाठी शालेय उपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले.

यामध्ये प्रामुख्याने गणित हा विषय शिकवण्यासाठी लागणारे साहित्य, भौगोलिक दृष्ट्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी लागणारे नकाशे, शाळेमध्ये लागणारे टेबल, खुर्च्या, कपाट, मास्क, सॅनिटाजर स्टॅन्ड आदी साहित्य देण्यात आले.

याप्रसंगी संत तुकाराम विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तुकाराम असवले,रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे अध्यक्ष संतोष शेळके, रो. विलास काळोखे,क्लब ट्रेनर रो. दिलीप पारेख, रो. संजय मेहता, रो. रेश्मा फडतरे , रो. वैशाली खळदे, रो. अविनाश नांगरे, उद्योजक अजय शेलार उपस्थित होते.

संत तुकाराम विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तुकाराम असवले यांनी हे महाविद्यालय ग्रामीण भागात असून विना अनुदानित असल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते याची माहिती रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीच्या सदस्यांना सांगण्यात आली. याची दखल घेऊन रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीने साहित्याचे वितरण केले. आणि इथून पुढे या विद्यार्थ्यांना तसेच शाळेस कोणतीही मदत लागल्यास आम्ही मदत करू अशी ग्वाही दिली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक खांडेकर सर यांनी केले.तर नियोजन दत्ता कर्डीले, भरत जोरे आणि शिक्षकवृंद यांनी केले. या प्रसंगी शाळेतील विद्यार्थी तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.