Talegaon News : ‘दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स’तर्फे गरीब कुटुंबांना मोफत जेवण, जीवनावश्यक साहित्याचे वाटप

0

एमपीसीन्यूज : ‘दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स’च्यावतीने कॅप संस्थेच्या सहकार्यातून मावळ आणि जुन्नर तालुक्यातील गरजू आणू गरीब कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. आतापर्यंत तीन हजार कुटुंबांना दररोज मोफत जेवण आणि महिनाभर परेल इतके जीवनावश्यक साहित्य भेट दिले. तसेच लहान मुलांना खाऊवाटपही केले.

समाजात वंचित आणि आर्थिक दुर्बल कुटुंबं मोठ्या संख्येने आहेत तसेच त्यांच्या प्रती सामाजिक भान असलेल्या दानशुर व्यक्तीसुद्धा समाजात आहेत. अशाच पुण्यातील दानेशभाई, संजयभाई शहा, त्यांचे व्यावसायिक मित्र व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई भागवत यांनी एकत्र येउन ‘दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स’ची निर्मिती केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत दररोज तीन हजार गरीब व गरजूंना मोफत जेवण देण्याचा उपक्रम पुण्यात सुरु केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

तसेच त्यांनी मावळ आणि जुन्नर तालुक्यातील कातकरी आदिवासी कुटुंबांना मदत करण्याचे ठरवले. साप्ताहिक अंबरचे मुख्य संपादक सुरेश साखवळकर व पुणे येथील जनसेवा फौंडेशनचे जयवंत मंत्री यांच्या माध्यमातून त्यांनी मावळातील कॅप संस्थेशी संपर्क साधला, तसेच 2 जूनला कामशेतजवळील वडिवळे व मुंढावरे येथील अतिशय हलाखीचे जिणे जगणाऱ्या 50 गरीब कुटुंबांना सुमारे एका महिना पुरेल इतके रेशन, कांदे, बटाटे दिले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ताडपत्री वाटपदेखील करण्यात आले.

यावेळी उपस्थित असलेल्या लहान मुलांना कॅपतर्फे खाऊ वाटप करण्यात आले. दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या या समाजमित्रांनी कॅपतर्फे चालवण्यात येणाऱ्या वीटभट्टी कामगारांच्या मुलांच्या शाळेला भेट दिली व कॅपच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती घेऊन यापुढे कॅपला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. एकूणच कॅपचे उपक्रम त्यांना खूपच आवडले.

यावेळी कॅप संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा नयना आभाळे व ज्येष्ठ सदस्य प्रदीप साठे उपस्थित होते. कॅपचे स्थानिक हितचिंतक श्री थोरवे व त्यांच्या सहकार्यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment